विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जना सोबतच उद्योजगाकडे वळावे — डॉ शंकरराव विभुते !
आजच्या आधुनिक काळात विद्यार्थ्यांनी ज्ञाना बरोबर उद्योजकडे वळावे असे प्रतिपादन डॉ. शंकर विभुते यांनी डी के फार्मसी महाविद्यालयात प्रसिद्ध उद्योगपती आरजेडी टाटा यांच्या स्मृतिदिनानिमित्त केले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजय क्षीरसागर होते.
डॉ.शंकर विभुते यांनी आपल्या व्याख्यानात जे. आर.ङी. टाटांचे जीवन चरित्र सांगून ते प्रसिद्ध उद्योगपती, उद्योजक, विमान चालक आणि टाटा समूहाचे अध्यक्ष व पुरोगामी विचारचे होते हे स्पष्ट केले, त्याच पद्धतीने के पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी हे महाविद्यालय नव्या पिढीतील उद्योजक घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे योगदान देत असून महाविद्यालयीन जीवनातच उज्वल भविष्यातील स्वप्नांचे बीजारोपण होत असते. महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट हे काम चोख पद्धतीने करत आहे म्हणून विद्यार्थ्यानी उद्योजक बनून स्वतःचा व देशाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील रहावे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात जे. आर. ङी. टाटा यांना श्रध्दांजली अर्पण करून करण्यात आले. यानंतर पंकज तंत्रे यांनी कार्यक्रमाचे उद्देश व रूपरेषा विषद केली व तसेच नेहा हाके व पृथ्वीराज आंबूलगेकर या विद्यार्थ्यांनी जे.आर. ङी. टाटा यांच्या जीवन प्रवासाला उजाळा देत त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. तसेच देशासाठी कार्य करत असताना सामोरे गेलेल्या संघर्षांबद्दल मत व्यक्त केले .
आभार प्रदर्शन प्राध्यापिका कोमल शिंदे यांनी केले .
कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थि मोठया संख्येने
Link :- https://aajnanded.com/?p=6863
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |