स्वारातीम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर डाँ.अजय क्षिरसागर यांची बिनविरोध निवड.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील विविध अभ्यास मंडळाच्या निवडी बाबतची घोषणा १ डिसेंबर रोजी करण्यात आली . औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमातील दोनही अभ्यास मंडळाच्या नियुक्तीचे परिपत्रक विद्यापीठाने जाहीर केले . यात फार्माकोलोजी टॅक्सीकॉलॉजी फार्मकॉग्नोसी व कॉलिटी अशरन्स अभ्यास मंडळावर डी के पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लोहा येथील डॉ. अजय दिगंबर क्षिरसागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली . विद्यापीठ कार्यक्षेत्रात तथा लोहा परिसरात याबाबत सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे. नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्यापासून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यासमंडळाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन , जागतिक स्तरावरीची स्पर्धा व दर्जा विद्यापीठाचा टिकविण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमांत सातत्यपूर्ण बदल होणे आवश्यक असतात. म्हणून येत्या काळात नवनवीन अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ मंडळीद्वारे शिफार केलेला अभ्यासक्रम विद्यापीठ राबवत असतात. यानिवडीबद्दल समाधान व्यक्त करताना क्षिरसागर सरांनी विद्यापीठ परिक्षेत्रातील प्राध्यापक , विभाग प्रमुख व महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे विशेष आभार मानले आहेत. बिनविरोध निवड झाल्यामुळे डॉ. अजय क्षीरसागर प्राचार्य डी के पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे डॉ. नरेंद्र पत्रे, प्रा संदीप अंभोरे, प्रा प्रज्ञा भोसले, प्रा संदीप सूर्यवंशी, प्रा शालिनी ढवळे, वाघमारे सर कबीर सर माने मंडम व सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी यानी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |