“डी. के. पाटील फार्मसी महाविद्यालयात जे. आर. डी. टाटा जन्मदिन साजरा.”
लोहा - जे. आर. डी. टाटा यांच्या ११८ व्या जन्मदिना निमित्य येथील डी. के. पाटील फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा उद्योजकता विकास होण्यासाठी ऑनलाईन झूम मीटिंग घेण्यात आली. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. शंकर पवार , प्रकल्प अधिकारी , महाराष्ट्रा स्टेट फॉर इंटप्रुनरनशिप फॉर डेव्हलपमेंट हे होते. सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय क्षीरसागर यांनी त्यांची ओळख करून देत कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. हा कार्यक्रम बी. फार्मसी च्या विध्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे श्री. शंकर पवार यांनी उद्योग सुरु करण्यासाठी आणि चांगला उद्योजक होण्यासाठी लागणारी कौशल्य , रोजगाराच्या नवीन संधी , महाराष्ट्र राज्याच्या रोजगार योजना , मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि विविध स्टार्ट अप प्लॅन्स अश्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्न- उत्तर मध्ये विध्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन करून विध्यार्थ्याना प्रोत्साहित केले.
ह्या कार्यक्रमाला द्वितीय व तृतीय बी फार्मसी चे विध्यार्थी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मिळून २०५ जण उपस्तित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन हे प्रा. शालिनी ढवळे यांनी केले