“ डी. के. पाटील फार्मसी महाविद्यालयात विध्यार्थी व प्राध्यापकाने अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेतली. "
लोहा - केंद्र शासनाच्या आझादी का अमृत महोत्सव या अभयानाअंतर्गत दि. १२/०८/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा सर्व विध्यार्थी व प्राध्यापकाने प्रतिज्ञा घेतली. ह्या प्रसंगी तरुण हीच खरी देशाची संपत्ती आहे व देशाच्या विकासात तरुणाचे महत्वाचे योगदान असते त्यामुळे सर्व तरुण हे नशामुक्त व निर्वेसनी असणे आवश्यक आहे त्यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी ह्या अभियानात सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून सर्वजण एकजूट होहून आपण स्वतः आणि समाज , कुटुंब आणि मित्र नाशामुक्त होयुया कारण स्वतःची सुरुवात स्वतःपासूनच झाली पाहिजे असा दृढ संकल्प करूया असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजय क्षीरसागर यांनी केले. ह्या कार्यक्रमाचा उद्देश स्वतः नशामुक्त होणे तसेच सर्वानी मिळून आपला नांदेड जिल्हा , महाराष्ट्र राज्य नशामुक्त करण्याचा होता आणि त्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत.
ह्या कार्यक्रमासाठी डी फार्मसी व बी. फार्मसी चे सर्व विध्यार्थी व विद्यार्थिनी तसेच सर्व प्राध्यापक वर्ग यांनी सहभाग नोंदवला. ह्या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. सुदाम मुळे यांनी केले .