1. Home
  2. Event
  3. झाशीची राणी लक्ष्मीबाई व इंदिरा गांधी जयंती साजरी

झाशीची राणी लक्ष्मीबाई व इंदिरा गांधी जयंती साजरी

  • Published: November 20, 2022
झाशीची राणी लक्ष्मीबाई व इंदिरा गांधी जयंती साजरी

झाशीची राणी लक्ष्मीबाई व इंदिरा गांधी जयंती साजरी

९ नोव्हेंबर २०२२ रोजी झाशीची राणी लक्ष्मीबाई व इंदिरा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम उपस्तित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय क्षीरसागर , डॉ. नरेंद्र पत्रे , प्रा. संदीप सूर्यवंशी , प्रा. शालिनी ढवळे , विध्यार्थी प्रतिनिधी कु. वैष्णवी दंडगे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून झाले. यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय क्षीरसागर यांनी विध्यार्थ्यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई व इंदिरा गांधी जयंती साजरी करण्यामागचा उद्देश सांगितला तसेच त्यांनी केलेले कार्य व घेतलेले निर्णय यापासून सर्वानी त्यापासून प्रेरणा घ्यावी व तसे कार्य करण्याचा प्रयत्न करावा. आजच्या काळात स्त्रिया ह्या सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत आणि म्हणून कोणीही मागे राहू नये असेही सांगितले. मुलगी शिकली तर समाज सुधारतो असेही ते म्हटले. यानंतर बी. फार्मसी च्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कु. दीक्षा चौकले हिने झाशीची राणी लक्ष्मीबाई व इंदिरा गांधी यांचा जीवनप्रवास आपल्या शब्दात मांडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन कु . दीक्षा चौकले हिने केले. ह्या कार्यक्रमाला बी. फार्मसी चे विध्यार्थी , प्राध्यापक , प्राध्यापिका , व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तित होते.